रेल्वे प्रवास... मला माझ्या लहानपणा पासुन हा प्रवास अत्यंत ओढ लावणारा, उत्कंठा वाढवणारा असा वाटत आला आहे... झुकझुक अगीन गाडी... लहानपणी कोळशाच्या इंधनावर चालणार्या गाड्या फार वेगळा प्रवासाचा अनुभव द्यायच्या... धूर, खिडकीतुन बाहेर पाहण्याचा प्रयत्न केल्यास डोळ्यात जाणारे बारीक कोळश्याचे कण ! आणि त्यामुळे डोळा लाल होउन पाणी यायचे... अश्या अनेक आणि अगणित आठवणी रेल्वे प्रवासाशी निगडीत आहेत. निरिक्षण करत प्रवास करणे ही माझी आवड आणि सवय सुद्धा आहे, त्यामुळे अनेक गोष्टी टिपण्यास, समजण्यास आणि लक्षात ठेवण्यास मदत होते.
अनेक वेगवेगळे लोक, वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळ्या स्थानकांवर उतरणारे आणि चढणारे...कधी सहकुटुंब प्रवास करणारे, तर कधी एखादा एकटाच प्रवास करणारा व्यक्ती... मधेच येणारे विक्रेते, भेळवाले, भीक मागणारे तर चेकींगसाठी अचानक चक्कर टाकुन जाणारे रेल्वे सुरक्षा दल. प्रत्येक प्रवास एक वेगळा अनुभव देणारा असतो...या प्रवासात भेटणारे, गप्पा मारणारे, भांडणारे परत या आयुष्यात एकमेकांना भेटणार सुद्धा नाहीत... तरी सुद्धा काही काळ प्रत्येक जण या प्रवासाच्या अनुभवातुन एकत्रपणे जात असतो...
मला प्रवासात रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजुंनी दिसणार्या अनेक गोष्टी पहायला फार आवडतात... शेत, रस्ते, नद्या, पूल आणि बरंच काही.
जेव्हा एखाद्या सुटीची योजना करण्याची वेळ येते, तेव्हा ट्रेनच्या मोहिमेशी तुलना होऊ शकेल अशी वाहतुकीची क्वचितच साधने मिळतील. प्रवासाचा अन्य कोणताही प्रकार तुम्हाला भारतीय ट्रेनच्या प्रवासाइतका अद्भुत भारताच्या नजीक नेऊ शकणार नाही. निश्चितच, मार्गात काही असुविधा आहेत, परंतु नकारात्मक गोष्टींपेक्षा सकारात्मक गोष्टी जास्तच आहेत. ट्रेनमधील प्रवासाच्या आपल्या मार्गात आपण जे काही पाहतो ते अवर्णनीय असते. खऱ्या भारताशी भेट: भारतातील ट्रेनचा प्रवास तुम्हाला तुमच्या संस्कृतीच्या, तुमच्या लोकांच्या आणखी जवळ घेऊन जातो. तुमच्या सोबत प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची एक वेगळी कहाणी असते. ट्रेन तुम्हाला लोकांबरोबर बसण्याची संधी देते. त्यात सर्व प्रकारचे लोक असतात आणि तुम्ही त्यांच्या कहाणीचा एक भाग बनता. तुम्ही धबधब्यांच्या जवळून जाता किंवा जंगलातून जाता किंवा लाटांमधून जाता. वेगाने जाणारी ट्रेन जेव्हा एका बोगद्यातून जात असते, त्या वेळी प्रत्येकाच्या हृदयात उत्पन्न होणारा रोमांच तुम्ही कधी अनुभवला आहे काय किंवा पावसाळ्यात दाट जंगलाचे किंवा धबधब्याचे संमोहक दृश्य तुम्ही विसरू शकता काय? वास्तविक जीवनातील बॉलीवूड कथा तुमच्या डोळ्यासमोर घडतात: ट्रेनचा प्रवास केवळ प्रवासापेक्षा आपल्यासाठी बराच काही असतो. भेटण्यासाठी डोळ्यांसाठी, हृदय चोरी करण्यासाठी, पहिल्याच नजरेत प्रेम होण्यासाठी ही एक उत्तम जागा आहे. अनेक पाककृती: ‘आलू पुरी ते पराठा”, आणि ‘आम का आचार’ ते ‘मोसमी फळे’ या सर्व गोष्टी आपण आपल्या भोजनात सामील करून घेतो. आपण आपल्या घराच्या खाण्याशी ट्रेनमध्ये देखील कधीही तडजोड करत नाही, आणि जर घरचा डबा तुमच्या सोबत नसेल तर, काळजी करू नका, तुमचे सहाप्रवाशी त्यांच्या स्वादिष्ट खाण्याचा घास तुम्हाला देण्यास कधीही संकोच करणार नाहीत.
तुम्ही एखाद्या धावणाऱ्या ट्रेनला कधीही पकडू शकता: ते फार धोकादायक असते, पण तरी देखील आपल्या आयुष्यात प्रत्येक सुपर इंडियनने याचा अनुभव घेतलेला असतो आणि या वेडेपणावर नंतर हसलेला असतो. पाय ठेवण्यास भरपूर जागा: तुमच्या सीटवर बसून थकला असाल, तर थोडे चाला किंवा वरच्या बर्थवर आडवे पडा किंवा एखाद्या स्टेशनवर उतरून एखादा फेरफटका मारा. ट्रेनच्या प्रवासात नेहमी तुम्हाला आरामदायक वाटेल. संगीतमय घोरण्याला हाताळणे: आपल्या झोपेचा कोटा पूर्ण करण्यासाठी काही लोकांसाठी ट्रेनचा प्रवास अतिशय उत्तम ठरतो. त्यांना फक्त सर्वात वरचा बर्थ आणि एका उशीची गरज असते. ट्रेनची झुकझुक आणि तालावरील चाकांची धडधड याचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही आणि सर्व सहप्रवाशांना त्यांच्या घोरण्यामध्ये विविधता ऐकण्यास मिळू शकते. काहीवेळा ते तापदायक वाटते, परंतु तो देखील एक अनुभवच असतो. “कुल्हडवाली चाय”चे प्रेम: कुल्हडवाली चायसाठी वात पाहणे ट्रेनच्या प्रवासातील सर्वोत्कृष्ट गोष्ट असते. हे एक जादूमय पेय असते जे अक्षरशः तुम्हाला तुमच्या मातृभूमीच्या समीप नेते आणि प्रत्येक झुरक्याबरोबर मातीच्या सुगंधास पसरविते. तुमच्या बालपणीच्या आठवणी जागृत करते: रोमांच आणि खिडकीच्या जागेसाठी मुलांचे भाडणे पाहून तुम्हाला बालपणी तुमच्या भावा-बहिणीबरोबर झालेल्या भांडणांची निश्चितच आठवण येत असेल. तसेच, लुडो, कार्ड्स आणि कॉमिक्स तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची आठवण करून देतील आणि तुमच्या चेहऱ्यावर एक स्मित आणतील. याहून अधिक तुम्हाला काय हवे? असे काही तरी जे तुम्हाला वाटते चालतच राहावे…: हा प्रवास सहासा इतका शांततामय असतो, की तुम्हाला खरं म्हणजे तुमच्या गन्तव्य स्थानाबद्दल फिकीरच नसते. ते प्रवास मंत्रमुग्ध करणारे असतात; ते अविस्मरणीय असतात आणि सहसा आयुष्यभरासाठी जतन करून ठेवण्यासाठी अनेक आठवणी बनवितात.

लेखक : गणेश भूसारी
ठिकाण : त्रिमूर्तीनगर, नागपूर
फोन : ८९९९३५००४४