"फिराला जायाचं , फिराला जायाचं"
"पण कुठं जायाचं "
"केरळला"
"का? तिकडेच का?"
अरबी समुद्र, पश्चिम घाट यांच्यामध्ये विसावलेल्या केरळची सृष्टी सौंदर्याबद्दल ख्याती आहे. पर्यटन स्थळामध्ये केरळने उच्चस्थान पटकावले आहे. केरळ म्हणजे नारळाच्या हिरवगार बागा, फेसाळलेले सागरकिनारे आणि कोरीव शिल्पांची पुरातन मंदिरे या गोष्टी प्रेक्षणीय आहेत. या सर्व एव्हरग्रीन केरळच्या पॉप्युलर, प्रीमियम आणि ऑफबीट टूर्स पर्यटक कधीच विसरणार नाहीत. त्या त्या ठिकाणाप्राणे उत्तोत्तम हॉटेल्सही समाविष्ट आहेत. कोचीन, कुमारकोम, कोवालम्, मुन्नार ही केरळमधील प्रीमियम डेस्टिनेशन्स, बॅकवॉटरवर वसलेले छोटेसे बेट कुमारकोमल जेथे गेल्यावर आयलँड गेल्याचा भास होतो तर कोवाल हे एक सुंदर असे बीच डेस्टिनेशन आहे. केरळमध्ये निसर्गाचे वैविध्य लाभलेली अनेक ऑफ बीट डेस्टिनेशन्स आहेत. त्यातील एक म्हणजे पुवर! एक सिनिक ब्युटी म्हणून पुवर बीच प्रसिद्ध आहे. मनमोहक बीच, सदाबहार वनराई, हिरवेगार चहाचे मळे, उंचच उंच नारळ आणि ताडाची झाडे, निळाशार समुद्र यामुळे पर्यटक बाराही महिने येत असतात. २२ जुलै तारखेला सकाळी ४. ०० ला अहिल्यानगरी एक्सप्रेस ने नागपूर सोडले आणि गाडी केरळला पोहोचायच्या आधीच गणेशाच्या फोटोसारखे केरळचे दर्शन होईल असे दृष्य नजरे समोरुन जायला लागले.
गाडीने जसे महाराष्ट्र सोडले तसा बाजुचा निसर्ग हिरवागार झाला. संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत आम्ही तामिळनाडू राज्यात पोहचलो. आणि सकाळ होईस्तोवर गाडीने संपुर्ण तेलंगणा आणि तामिळनाडू पार केले होते. सकाळी उठलो तर पहिल्या केरळच्या स्टेशनचे दर्शन झाले नाव होते पल्लक्कड . लोहमार्गाच्या दोन्ही बाजुला सगळी नारळाच्या झाडांची माडी होती. या झाडांच्या माडीत तिथल्या लोकांची टुमदार एकमजली बंगले आहेत. तर थिरुरला केळीच्या बागा पहायला मिळाल्या. काही ठिकाणी मोठ्या नद्या समुद्रला जावुन मिळत होत्या. धावत्या गाडीतुन त्याचे काही फोटो घेतले.
अशा प्रीमियम केरळची सुरूवातच कोचीनमधील केरळचा सांस्कृतिक नजराणा, कथकल्ली नृत्याच्या लाइव्ह परफॉर्मन्सने होते. त्यानंतर हार्बर क्रूझ राईडमधून फिरताना चायनीज फिशिंग नेटचा अप्रतिम नजारा पाहता येतो. कोचीनच्या ताज मलबार या लक्झुरियस हॉटेलमधील लंचचा स्वाद सदैव जिभेवर तरळतो.
हे त्या आकर्षणांपैकी एक आहे ज्याचे देशात आणि परदेशात पर्यटकांसाठी पर्यटन स्थळाच्या रूपात केरळच्या प्रसिद्धित मोठे योगदान आहे. तीन पर्वत रांगा- मुथिरपुझा, नल्लथन्नी आणि कुंडल ह्यांच्या संगमावर वसलेले आहे आणि समुद्रसपाटीपासून त्याची उंची अंदाजे 1600 मी आहे. मुन्नारचे हिल स्टेशन कधीकाळी दक्षिण भारताच्या पूर्वकालीन ब्रिटिश प्रशासनाचे उन्हाळी रिसॉर्ट.
या हिल स्टेशनची ओळख आहे इथल्या विस्तिर्ण भू भागात पसरलेली चहाची शेती, वसाहती बंगले, छोट्या नद्या, झरे आणि थंड हवामान. ट्रेकिंग आणि माउंटेन बाइकिंगसाठीही हे एक आदर्श स्थळ आहे.
चला आता मुन्नार आणि आजूबाजूचे काही अन्य पर्याय शोधूया जे मुन्नारच्या मोहक हिल स्टेशनचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांना पुरेशा संधी देतात.
इरवीकुलम राष्ट्रीय उद्यान मुन्नार आणि त्याजवळील भागातील एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे इरवीकुलम राष्ट्रीय उद्यान होय. हे उद्यान मुन्नारपासून साधारण 15 किमीदूर अंतरावर असून लुप्तप्राय होत चाललेला प्राणी –“नीलगिरी टार” साठी हे ओळखले जाते. 97 चौ.किमी अतंरापर्यंत पसरलेले हे उद्यान दुर्मिळ जातीची फुलपाखरे, वन्यजीव आणि पक्षांच्या अनेक दुर्लभ जातींचे आश्रयास्थान आहे. हे स्थान ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम आहे. उद्यानातील चहाचे विस्तृत मळे आणि त्याचबरोबर पर्वतरांगावर वेढलेली धुक्याची दाट चादर यांचे एक मनमोहक दृष्य येथे पहावयास मिळते. नीलकुरिंजीच्या फुले फुलल्यानंतर जेव्हा पर्वताची उतरण जणु काही नीळ्या रंगाच्या चादरीने झाकली जाते ,तेव्हा तर हे उद्यान पर्यटकांसाठी प्रथम पसंतीचे ठरते. हे (नीलकुरिंजीचे) झाड पश्चिमी घाटातील या भागातील स्थानिक झाड आहे, ज्याला बारा वर्षातून एकदाच फुले येतात. याआधी 2006 साली याला फुले आली होती.
आनामुडी शिखर हे इरवीकुलम राष्ट्रीय उद्यानाच्या आतील भागात आहे. 2700 मीटरपेक्षा अधिक उंच असलेले हे शिखर दक्षिण भारतातील सर्वात ऊंच शिखर आहे. शिखरावर ट्रेकिंग करून चढण्यासाठी इरवीकुलम येथील वन आणि वन्यजीवन प्राधिकरण यांच्याकडून अनुमती घ्यावी लागते..
माट्टपेट्टी मुन्नार शहरापासून दूर 13 किमी अंतरावर दुसरे एक आकर्षक स्थान आहे ते म्हणजे माट्टपेट्टी. हे समुद्रसपाटीपासून साधारण 1700 मीटर उंचावर आहे. माट्टपेट्टी हे मेसनरी धरणाचे स्टोरेज/आश्रयस्थान म्हणून तसेच सुंदर तलावासाठी ओळखले जाते.येथे पर्यटकांसाठी पर्वतरांगा आणि आजूबाजूची प्राकृतिक दृश्ये यांचा आनंद लुटताना सुखकर अशा नौकाविहाराची सोयही उपलब्ध आहे. माट्टपेट्टीच्या प्रसिद्धिचे श्रेय इंडो- स्विस लाइव्हस्टॉक परियोजनेद्वारा संचालित डेअरी उद्योगाला देखील जाते. येथे तुम्ही अधिक प्रमाणात दूध देणार्याप गायींच्या जाती पाहू शकता. हिरवेगार चहाचे मळे, वर-खाली असलेली गवताची कुरणे आणि शोला वनाबरोबरच माट्टपेट्टी हे ट्रेकिंगसाठी देखील आदर्श स्थळ आहे. याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या पक्षांचे निवासस्थान म्हणून हे ठिकाण ओळखले जाते.
पल्लिवासल हे मुन्नार मधील चितिरपुरमपासून साधारण 3 किमी दूर अंतरावर स्थित आहे. हे केरळमधील पहिले हायड्रो-इलेक्ट्रिक परियोजना स्थळ आहे. हे ठिकाण व्यापक प्राकृतिक सौंदर्याने बहरलेले आहे आणि पर्य़टकांचे आवडते सहलीचे स्थळ आहे.
चिन्नकनाल हे मुन्नार शहराच्याह जवळ असून येथील धबधबे हे पॉवर हाऊस वॉटरफ़ॉल या नावाने ओळखले जातात.या धबधब्याचे पाणी समुद्रसपाटीपासून 2000 मीटर उंच शिखरावरून खाली पडते. हे स्थळ पश्चिमी घाटातील पर्वतरांगांच्या नैसर्गिक दृष्यांनी समॄद्ध आहे.
अनयिरंगल चिन्नकनालपासून साधारण सात किमी अंतर जेव्हा तुम्ही पार करता तेव्हा अनयिरंगल हे ठिकाण लागते. मुन्नारपासून 22 किमी दूर अंतरावर असणारे अनयिरंगल हे चहाच्या हिरव्यागार झाडांचा जणुकाही गालिचाच आहे. येथील शानदार जलाशयाची सफ़र हा तर एक अविस्मरणीय अनुभवच ठरतो. अनयिरंगल धरण हे चारही बाजूंनी चहाचे मळे आणि सदाबहार अशा हरित वनांनी घेरलेले आहे.
टॉप स्टेशन म्हणजे मुन्नारपासून साधारण 3 किमी दूर अंतरावर असलेले टॉप स्टेशन हे समुद्र सपाटीपासून 1700 मी. उंचीवर आहे.मुन्नार – कोडईकॅनाल मार्गावरील हे सर्वात उंच स्थान आहे. मुन्नारला येणारे पर्यटकदे खील टॉप स्टेशनला थांबून तेथून दिसणार्याा शेजारील तामिळनाडू राज्यातील विहंगम दृष्यांचा आनंद लुटतात. मुन्नारमध्ये विस्तृत प्रमाणात पसरलेली नीलकुरिंजीची फुललेली फुले पाहण्यासाठी देखील हे एक उपयुक्त स्थान आहे.
मुन्नार मधील चहा संग्रहालय चहाच्या मळयांची उत्पत्ति आणि विकासाच्या दृष्टीने मुन्नारला आपली अशी एक स्वतंत्र परंपरा आहे. ह्या परंपरेला ध्यानात घेता, केरळमधील ऊंचच ऊंच पर्वतरांगांमधील चहाच्या मळ्यांची उत्पत्ति आणि विकासाच्या काही सूक्ष्म आणि आकर्षक पैलूंना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि प्रदर्शनीय ठेवण्यासाठी मुन्नारमध्ये टाटा टी द्वारा काही वर्षांपूर्वी एका संग्रहालयाची स्थापना केली गेली. या चहा संग्रहालयामध्ये दुर्लभ कलाकृती, चित्रे आणि यंत्रे ठेवली गेली आहेत ज्यांना स्वतःची अशी वेगळी कहाणी आहे. ही सर्व मुन्नारमधील चहाच्या मळ्यांची उत्पत्ति आणि विकासाच्या बाबत सांगतात. हे संग्रहालय टाटा टीच्या नल्लथन्नी इस्टेट पैकी एक दर्शनीय स्थळ आहे. येथे जरूर जा.
आमचा पुढील मुक्काम आलेपा ला होता अल्लेप्पी केरळला देवांची भूमी असे म्हटले जाते , त्यातही अल्लेप्पी किंवा अलाप्पूझा हे केरळमधील एक पर्यटकांच्या प्रथम पसंतीचे व अत्यंत आवडते आणि लाडके असे ठिकाण आहे. अल्लेप्पीला चहूबाजूंनी अरबी समुद्राने वेढलेले असून याला ‘ पूर्वेचे व्हेनिस ’ म्हणूनही ओळखले जाते. येथील आसमंतात निसर्गाने आपला अमूल्य नजराणा जागोजागी मुक्त हस्ते उधळला असल्याचे दृष्टोत्पत्तीस येते.अरबी समुद्र व त्याला चहूबाजूंनी येऊन मिळणार्याि सहा आडव्या उभ्या नद्यांमुळे तयार झालेल्या जाळ्यांत अल्लेप्पी वेढले गेले आहे. येथे सहा गोड्या पाण्याच्या नद्यांखेरीज अनेक प्रवाह,तलाव,विस्तीर्ण सरोवरे, जलाशय व ओढे एकमेकांना छेदतात व त्यामुळे त्यांच्या मध्ये जे पाण्याचे खूप रुंद पट्टे (कॅनाल) बनतात त्यातूनच बोटीतून पर्यटकांना सफर घडवली जाते. सभोवतालच्या मनोहर निसर्गाचे मन लुभावणारे अप्रतिम व अवर्णनीय सृष्टी सौंदर्य पाहतांना भान हरपून जाते,तहान-भूक विसरायला होते.कितीही डोळे भरून पाहून घेतलेतरी मनाचे तृप्तीच होत नाही. परतूच नये असे वाटते. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी केरळला व त्यातही अल्लेप्पी येऊन हा अलौकैक अनुभव स्वत: प्रत्यक्ष घ्यावाच. आलेप्पी येथे हॉउसबोट चा आनंद घेता येतो . तलावाच्या सभोवतालच्या गावांचे दृष्य तुम्हाला एका वेगळ्याच जगाकडे घेऊन जातात .अलेप्पे हे केरळचे सहावे सर्वात मोठे शहर आहे, कोचीच्या ६२ किमी दक्षिणेस त्रिवेंद्रमपासून १५५ किमी अंतरावर आहे. आपण जलपर्यटन जहाजात जाऊ शकता, समुद्री लाटांवर प्रवास करणे हे काहीतरी वेगळंच आहे.हा प्रवास आमच्यासाठी खूप रोमांचक होता ..
मुन्नार नंतर आह्मी सकाळी थेक्कडीला जायला निघालो आणि साधारण बाराच्या सुमारास तिथे पोचलो . ते थंड हवेच ठिकाण आहे. दुपारी तिथली स्पाईस गार्डन बघितली. नंतर हत्तीच्या राईड वगेरे होत्या तिथे ही गेलो. लोकल शॉपिग केल.
आमचे केरळ मधील जसजसे दिवस जात होते आम्ही केरळी संस्कृती सोबत एकरूप होत होतो. थेक्कडी नंतर आम्ही सकाळी हॉटेल मध्ये केरळी ब्रेकफास्ट घेतला आणि पेरियार नदीतल्या फेरफटक्याला निघालो. छान वाटल. पण आम्हाला प्राणी नाही फार दिसले. दुपार तशी मोकळीच होती त्या वेळेत तुम्ही केरळी मसाज, किंवा कथकली नृत्याचा कार्यक्रम पहाणे वैगेरे करु शकता. आता पर्यन्त आम्ही केरळ मध्ये बरेच रुळलो होतो . थोडी थोडी मल्याळम भाषा सुद्धा समजायला लागली होती . सकाळी गुरुवायुर ला जायला निघालो. गुरुवायुर अंतर खूप नसले तरी रस्ते अरूंद आणि सततची मनुष्य्वस्ती. त्यामूळे केरळमध्ये कुठे ही वेग घेता येतच नाही गाडीला. आम्ही साधारण एक च्या सुमारास पोचलो तिथे पण दिड वाजता दुपारी देऊळ बंद झाल ते चार वाजता उघडण्यासाठी. जेवण, खरेदी वैगेरे टाइम पास केला मग. तिथे आम्हाला पहिल्यांदा केळीच्या पानावर केरळी जेवण मिळाले. नाहीतर हॉटेल मध्ये जनरली फक्त ब्रेकफास्ट केरळी आणि लंच , डिनर पंजाबी असा प्रकार आहे तिथे. गुरुवायुरच मंदिर फार सुंदर आहे. दर्शन घेईपर्यंत संध्याकाळ होतच आली होती म्हणून मग आणखी थोडा वेळ थांबून तेलाच्या दिव्यात प्रकाशलेले मंदिर बघितल आणि मग कोचीन ला यायला निघालो. तुम्ही पाहिजे तर एक दिवस मुकाम करा गुरुवायुरला . लक्ष लक्ष तेलाच्या दिव्यांच्या प्रकाशात उजळलेले मंदिर बघणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे फार सुंदर आहे ते. चुकवु नका. दुसर्या दिवशे लवकर उठुन कोचीनला येऊ शकता. आमच्या ट्रिपचा शेवटला टप्पा म्हणजे त्रिवेंद्रम . त्रिवेंद्रम प्रसिद्ध आहे आपल्या भव्य मंदिरासाठी . त्याच पैकी एक म्हणजे पद्म्नाभ मन्दिर , एक राजवाडा, राजा रविवर्मा चित्र गॅलरी वैगेरे बघितल. पद्म्नाभ मंदिरात लुंगी किंवा धोती लागतेच पुरषांना त्यामुळे घेऊन जाणे इष्ट. अर्थात तिथे ही विकत मिळतेच. त्रिवेंद्रम शहर खूप कोझी वाटले त्रिवेंद्रम मधली दागिन्यांची दुकान पहाच पहा. खूपच हेवी जुवेलरी असते त्यांची. संध्याकाळी त्रिवेंद्रम पासुन जवळ असलेल्या प्रसिध्द बीच वर गेलो.
अश्या प्रकारे आमची केरळ सहल संपली . पण केरळ मधील त्या आठवणी आयुष्यभरा साठी मनात साठवून आम्ही आमच्या धावपळी च्या जीवनासाठी परत नागपूर ला निघालो. एका परिकथेतील विश्व बघितला होता आम्ही . केरळ मधील ते शुभ्र धबधबे , हिरवेगार चहाचे मळे , उंच पहाड , उसळणाऱ्या नद्या , आणि निळा समुद्र या सगळ्या गोष्टी मनाला आनंदीत करून गेला .येथे येऊन कळले केरळ ला का बरं म्हणतात गॉड्स ओन कंट्री ..... अर्थात केरळ !!!
Ganesh Bhusari ( Travel Guru )
Travel Lover & Blogger
No comments:
Post a Comment