भारतीय सिनेमात रोमॅन्स, ड्रामा, ट्रॅजेडीला जेवढं महत्त्व आहे,तेवढंच सिनेमा कसा दिसतो याला देखील आहे. सिनेमा चकचकीत दिसला की तो हिट ठरतो असं जुनं गणित होतं. त्यामुळेच तर सिनेमांचं चित्रीकरण करण्यासाठी खास लोकेशन्स ठरवली जायची. हिट सिनेमांनी आपल्या सोबत या ठिकाणांना पण प्रसिद्ध केलं. उदाहरणार्थ, थ्री इडियट्स सिनेमा. थ्री इडियट्स रिलीज झाल्यानंतर शेवटच्या दृश्यात दाखवलेला तलाव कुठे आहे आणि तिथे कसं जाता येईल याचं वेड आलं होतं.
आज आम्ही हिंदी सिनेमाने प्रसिद्ध केलेल्या अशाच मोजक्या १० ठिकाणांची यादी आणली आहे.
१. आमेर किल्ला
२. आग्वादा किल्ला
३. हिडींबा मंदिर, मनाली
डोंगरदऱ्या, जंगल या प्रकारच्या स्थळांसाठी मनाली हे नेहमीच प्रसिद्ध राहिलेलं आहे. राजेश खन्नाचा ‘आप की कसम’ आणि ऋषी कपूरचा ‘हीना’ या दोन्ही सिनेमांनी मनालीला प्रसिद्ध केलं. काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘यह जवानी है दीवानी’ सिनेमाने पुन्हा एकदा मनालीला चर्चेत आणलं होतं. सिनेमातील एका दृश्यात मनालीचं ‘हिडींबा मंदिर’ दाखवण्यात आलं आहे. सिनेमामुळे या मंदिराला भेट देणाऱ्यांची संख्या आता वाढली आहे.
हे सगळं असलं, तरी मनालीतलं हिडींबा मंदिर पाह्यलं की थेट रोजा सिनेमाच आठवतो, हो ना?
४. पांगोंग त्सो तलाव, लडाख
थ्री इडियट्स सिनेमातलं शेवटचं दृश्य याच ठिकाणी चित्रित करण्यात आलं होतं. ड्रोनच्या आधारे घेण्यात आलेलं हे दृश्य इतकं अफलातून होतं की सिनेमामुळे या तलावाला भेट देणाऱ्यांची संख्या एका रात्रीत वाढली. या परिसरातच ‘दिल से’, ‘जब तक है जान’ या सिनेमांचं शूटिंग झालं आहे.
५. वाराणसी
६. हावडा ब्रिज
७. सुवर्णमंदिर, अमृतसर
सिनेमात दिसलेलं सुवर्णमंदिर असा जर विचार केला तर ‘रब ने बना दी जोडी’ हा सिनेमा नक्कीच आठवतो. याखेरीज ‘रंग दे बसंती’ सिनेमा आठवल्याशिवाय राहत नाही. या सिनेमातलं गुरुग्रंथसाहिब मधल्या ओळी असलेलं ‘एक ओंकार’ गाणं प्रसिद्ध झालं होतं.
नुकतंच आमीर खानच्या आगामी ‘लाल सिंग चढ्ढा’ सिनेमाचं चित्रीकरण सुवर्णमंदिर येथे पार पडलं.
८. मुन्नारच्या चहाच्या बागा, केरळ
९. उदयपुरचा महाल, राजस्थान
१०. गुलमर्ग, काश्मीर
काश्मीरचं गुलमर्ग हे ठिकाण बॉलीवूडचं लाडकं राहिलेलं आहे. अनेक गाणी, दृश्य या भागात चित्रित झाली आहेत. ये जवानी है दिवानी, हायवे, रॉकस्टार आणि हैदर या सिनेमांतल्या कथानकाचा मोठा भाग हा गुलमर्गच्या परिसरात घडतो.
याखेरीज एक अपवादात्मक ठिकाण म्हणजे वाईचा घाट. आजकाल बऱ्याचशा सिनेमांमध्ये आपण जो उत्तर भारतातला प्रदेश बघतो तो खरं तर आपल्या महाराष्ट्रातल्या वाईचा घाट असतो.
तर मंडळी, ही होती बॉलीवूडने प्रसिद्ध केलेली भारतातली मोजकी १० ठिकाणं. तुम्हाला आणखी ठिकाणं आठवत असतील तर नक्की सुचवा.
Reference by: Bobhata
Ganesh Bhusari
( Travel Guru )
No comments:
Post a Comment